आमटेंच्या प्राणी अनाथालायाचा पुनर्विकास

आमटेंचे प्राणी अनाथालय

डॉ. प्रकाश आमटेंच्या प्राणी अनाथालयात साधारण ११५ प्राणी आहेत. माडिया-गोंड आदिवासी हा शेती करणारा समाज नाही. ते प्राण्यांची शिकार करून आपले पोट भरतात. या वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी लोक बिरादरी प्रकल्पाने हे बचाव केंद्र सुरु केले. आदिवासी अजूनही त्यांच्या उत्सवादरम्यान शिकार करतात आणि अनाथ झालेली पिल्ले अनाथालयात देतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना तांदूळ, भाज्या, कपडे इ. दिले जाते. अनाथालय “सर्प वाचवा” मोहिमदेखील चालवते. डॉ. प्रकाश आमटेंचे असे म्हणणे आहे की आपण सर्व प्राण्यांबद्दल संवेदनशील आणि प्रेमळ असले पाहिजे. त्यांच्या या भूमिकेमुळेच प्राण्यांना या अनाथालयात जे प्रेम मिळते ते इतर प्राणीसंग्रहालयात मिळत नाही.

केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार, लोक बिरादरी प्रकल्पाला प्राण्यांच्या पिंजऱ्यांचा/निवासाचा आकार वाढवावा लागेल आणि प्राण्यांना जास्तीत जास्त नैसर्गिक अधिवास द्यावा लागेल. अनाथालयाच्या सीमारेषेवर भिंती बांधल्या जात आहेत.

या प्राण्यांची काळजी घेण्यासाठी ८ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. त्यांना रेबीज होऊ नये म्हणून त्यांचे नियमितपणे लसीकरण केले जाते. प्रत्येक पिंजऱ्यावर Closed circuit TVs (CCTV) बसविले आहेत. उन्हाळ्यात पिंजरे हिरव्या कपड्याने झाकले जातात. तपमान नियंत्रित राखण्यासाठी पंखे आणि कूलरचा वापर केला जातो. हिवाळ्यात प्राण्यांना ऊब मिळावी म्हणून पिंजऱ्यांत गवत किंवा गोण्या पसरल्या जातात. सापांच्या पिंजऱ्यांत हीटर लावले जातात. पावसाळ्यात पिंजऱ्यांना आच्छादने लावली जातात. पावसाळ्यात कार्यकर्त्यांना विशेष काळजी घ्यावी लागते कारण जोरदार पावसाने पिंजरे कधीकधी पाण्याने भरून जातात आणि वादळी वाऱ्यांसह पडणाऱ्या पावसाने झाडे पडतात.

एक पूर्णवेळ पशुवैद्यकीय डॉक्टर या प्राण्यांच्या आरोग्य समस्यांची काळजी घेतो. प्राण्यांच्या प्रजातीनुसार ३ ते ६ महिन्यांनी त्यांचे लसीकरण केले जाते. ६ महिन्यांतून एकदा deworming केले जाते.

प्राणी अनाथालय दररोज ८ ते १२ आणि २ ते ५ सर्वांना बघण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध असते. केवळ बुधवारी दुपारी ते बंद असते. प्राण्यांचे छायाचित्रण करण्यास सक्त मनाई आहे.

टीप : महुआ, टिंबर यांसारखी हंगामी फळे प्राण्यांना नेहमीच दिली जातात.

वर्षिक सूची अहवाल
सूची अहवाल वर्ष/कालावधी : 1 एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२०
Sr. No. Animal Name Scientific Name Opening Stock Births Acquisitions Disposals Deaths Closing Stock
M F U T M F U M F U M F U M F U M F U T
Birds
1 Peafowl Pavo Cristatus 6 5 0 11 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 6 5 0 11
2 Kite Pariah/Black Kite Milvus Migrans Govinda 0 0 2 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 2
3 Owl Brown Fish Ketupa Zeylonensis Leschena 0 0 2 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 2
4 Parakeet Alexandrine Psittacula Eupatria 1 1 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 1 0 2
5 Mottled Wood Owl Strix Ocellata 0 0 2 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 2
6 Crested Serpent Eagle Spilornis Cheela 0 0 1 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 1
Total     7 6 7 20 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 7 6 7 20
Mammals
1 Antelope Four Horned (Chowsingha) Tetracerus Quadricornis 2 2 0 4 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 2 0 4
2 Bear Sloth Melursus Ursinus 2 7 0 9 0 0 0 3 0 0 2 2 0 0 0 0 3 5 0 8
3 Black Buck (Krishna Mrig) Antilope Cervicapra 0 1 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 1
4 Cat Jungle Felis Chaus 1 1 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 1 0 2
5 Civet Common Palm - Cat Toddy Paradoxurus Hermaphroditus 1 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1
6 Jackal Canis Aureus 3 1 0 4 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 3 1 0 4
7 Langur Common Semnopithecus Entellus 1 1 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 0 1 0 1
8 Leopard (Panther) Panthera Pardus 0 1 0 1 0 0 0 2 3 0 0 0 0 1 1 0 1 3 0 4
9 Macaque Rhesus Macaca Mulatta 6 8 0 14 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 6 8 0 14
10 Ratel Melivora Capensis 1 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1
11 Squirrel Giant Malabar/Indian Ratufa Indica 2 4 0 6 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 2 5 0 7
12 Deer Spotted (Chital) Axis Axis 8 13 0 21 0 0 0 0 1 0 0 0 0 0 0 0 8 14 0 22
13 Hyaena Stripped Hyaena Hyaena 1 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1
14 Nilgai - Blue Bull Boselaphus Tragocamelus 2 6 0 8 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 6 0 8
15 Porcupine Indian Hystrix Indica 4 3 4 11 0 0 0 0 0 1 0 0 0 1 0 0 3 3 5 11
16 Indian Wolf Canis Lupus Pallipes 0 2 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 2 0 2
17 Barking Deer - Indian Muntjac Muntiacus Muntjak 2 0 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1 0 0 1
Total     36 50 4 90 0 0 0 5 5 1 2 2 0 4 1 0 35 52 5 92
Reptiles/Amphibians
1 Crocodile Marsh (Mugger) Crocodylus Polustris 1 1 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 1 0 2
2 Monitor Lizard/Common Indian Varanus Bengalensis 1 1 0 2 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 1 0 2
3 Python Indian - Rock Python Molurus 1 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1
4 Snake Rat/Dhaman Ptyas Mucosus 1 0 0 1 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 1 0 0 1
Total     4 2 0 6 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 0 4 2 0 6
Grand
Total
    47 58 11 116 0 0 0 5 5 1 2 2 0 4 1 0 46 60 12 118