.... शिक्षण, जीवनपद्धती आणि जीवन यांचा संगम
"माझे ध्येय आहे, त्यांना असे शिक्षण देणे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या संस्कृतीचा अभिमान वाटेल. या लोकांची वाढ त्यांच्या आजोबांच्या संस्कृतीचा अभिमान वाटण्यात व्हावी, ती टाळण्यात नव्हे." - बाबा आमटे
स्वप्न |
या परिसरातील आदिवासी समुदायांच्या परंपरेत शिक्षण, जीवनपद्धती व जीवनाचे स्थानिक मूल्य शोधणे, परस्पर शिक्षणासाठी तथाकथित आधुनिक समाजांपुढे नेणे आणि संपूर्ण मानवजातीच्या जीवनाची समृद्धी वाढविणे. |
सामाजिक आणि आर्थिक विकासाकडे जाण्याचा शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे आणि आम्हांला कल्पना आहे की शिक्षण एका वेगळ्या पद्धतीने घडत नाही, त्याला जीवनाच्या विविध धाग्यांबरोबर विणावे लागते, जसे की, स्थानिक वातावरण, सामाजिक-सांस्कृतिक विरासत आणि वैयक्तिक आकांक्षा. याच तात्विक बैठकीने आम्हांला जिंजगाव येथे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी प्रेरित केले. हे गाव लोक बिरादरी प्रकल्प, हेमलकसा (जिल्हा गडचिरोली, महाराष्ट्र) पासून साधारण २५ कि.मी. वर आहे.
हे शैक्षणिक संकुल - लोक बिरादरी शिक्षा संकुल - जे जिंजगाव गावाच्या परिसरात वसले आहे, विविध संस्थांना बरोबर घेऊन हळूहळू वाढेल, एकमेकांशी संवाद करेल. वर सांगितल्याप्रमाणे, शिक्षण समग्र असले पाहिजे आणि ते विद्यार्थ्यांच्या स्थानिक वातावरणात रुजले पाहिजे. या शाळेत दिले जाणारे शिक्षण उद्योजकता, प्रशिक्षण आणि स्थानिक समुदायांसोबत घनिष्ठपणे जोडले जाईल.
संकुल मुले, युवक, महिला, स्थानिक कलाकार आणि कारागीर, एका अर्थाने तेथील संपूर्ण समाजाचीच सेवा करेल.
हे एका स्थिर आयुष्याचे देखील प्रतीक असेल, खासकरून जगभरातील त्या लोकांसाठी, ज्यांच्या हे लक्षात आले आहे की तथाकथित आधुनिक जीवनशैली किती अस्थिर आहे आणि आपल्याला जागतिक तापमानवाढ व सामाजिक अराजकतेकडे नेत आहे. उपभोक्तावाद, महागाई, निराशा यांच्या दुष्टचक्रात आपण अडकलो आहोत. म्हणूनच हे संकुल अशा जीवनशैलीचे प्रतीक बनेल, जी स्थिर, आत्मनिर्भर आहे आणि समाज व आसपासच्या पर्यावरणामध्ये रुजलेली आहे.
खऱ्या अर्थाने, शिक्षित आणि अशिक्षित, ग्रामीण आणि शहरी, आदिवासी आणि इतर यांच्यामधील परस्पर शिक्षण व सामायिकरण यासाठी ती एक जागा असेल ....... प्रत्येकजण काहीतरी शिकण्यासाठी काहीतरी शिकविण्यासाठी येथे येईल, एकमेकांच्या मतांना मान्यता आणि आदर व्यक्त करेल. नव्या भारताचे स्वप्न मांडताना बाबा आमटे म्हणाले होते, "प्राचीन काळापासून, कोणत्याही मान्यताप्राप्त समाजाचे किंवा राष्ट्राचे दोन स्तंभ असलेच पाहिजेत हे मान्य केले गेले आहे. परस्परांच्या अधिकारांची मान्यता आणि सर्वांच्या भल्यासाठी परस्परांना सहकार्य. या दोन स्तंभांना मजबूत करण्यासाठी नवीन भारत विशेष लक्ष देईल."
लोक बिरादरी शिक्षा संकुल हळूहळू आणि संघटीतरित्या वाढेल. प्रारंभी काही महत्वाची पाऊले उचलली जातील. ती खालीलप्रमाणे.
"आनंद रोगापेक्षा जास्त संसर्गजन्य आहे." - बाबा आमटे
पाया संरचनेची शक्ती निर्धारित करते. ४ ते ८ वयोगटातील मेंदू आणि मानसिक प्रक्रियांचा विकास अतिशय जलद असतो, मुले त्यांची ज्ञानेंद्रिये आणि मनाने आजूबाजूंच्या गोष्टींचा शोध घेऊ लागतात आणि प्रति-संकल्पना (per-concepts) बनवू लागतात, बोली भाषांमध्ये त्यांचे निष्कर्ष व समज व्यक्त करु लागतात.
यासाठीच त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीचे पोषण व्हावे म्हणून संकुलात एक Preschool (बालवाडी) स्थापण्यात येईल, जे या वयोगटासाठी फार महत्वाचे आहे.
हे जिंजगाव आणि आसपासच्या खेडेगावांतील ४ ते ६ वयोगटातील मुलांसाठी play school, त्यांच्या संशोधक वृत्तीसाठी जागा, बरोबरीच्या आणि काही मोठ्या मुलांबरोबर, तसेच मोठ्यांबरोबर मिसळण्यासाठी एक खुली शिकण्याची जागा असेल. ५ वर्षांच्या सुरुवातीच्या टप्प्यात, आम्ही बालवाडीत साधारण ५० मुलांना सामावून घेऊ.
बालवाडीत स्थानिक समुदायातील काही प्रशिक्षित तरुण महिला आणि पुरुष मुलांना शिकवतील. हे मुलांसाठी फायदेशीर असेल कारण ते स्थानिक भाषा आणि रीतिरिवाजांशी परिचित असतील. तसेच, स्थानिक तरुणांना त्यांच्या स्वतःच्या समुदायातील मुलांना सेवा देण्याची संधी मिळेल.
लोक बिरादरी प्रकल्पात या तरुणांना प्रशिक्षण देण्यात येईल आणि/किंवा त्यासाठी त्यांना संबंधित संस्थांकडे पाठवण्यात येईल.
शालेय शिक्षण ही मानवजातीने मिळविलेले ज्ञान सामायिक करणे आणि प्राप्त करणे यासाठी महत्वाची संस्था आहे, यामुळे आपल्याला स्वतःला समाजातील अविभाज्य घटक म्हणून शोध घेण्याची संधी देखील मिळते, लोकशाही राष्ट्रातील सक्रिय आणि महत्वाचे सहभागी म्हणून, आर्थिक जीवनासाठी एक नाविन्यपूर्ण आणि उत्पादक मानवी सहकार्य म्हणून आणि या वैश्विक समाजात एक संवेदनशील मनुष्य म्हणून.
गांधीजींनी योग्यरित्या दर्शविल्याप्रमाणे, वर्तमान शालेय शिक्षण, "हृदय आणि हात यांच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःला डोक्यापर्यंतच मर्यादित करते." म्हणूनच आम्ही अशी एक संस्था स्थापन करण्यास उत्सुक आहोत, जी सर्वसमावेशक असेल. समग्र शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी डोके, हात आणि हृदय यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे.
शाळेची ठळक वैशिष्टये खालीलप्रमाणे असतील,
आर्थिक स्थिरता आपल्याला विचार करण्याची आणि आपल्या मुलभूत गरजांपलीकडे लक्ष देण्याची संधी देते. आपल्या प्रिय राष्ट्राच्या वंचित, पीडित आणि निर्जन क्षेत्रातील नागरिकांसाठी हे अधिक महत्त्वाचे आहे. जिंजगाव अशाच एका भागात वसलेले आहे.
बाबा आमटयांनी म्हंटल्याप्रमाणे, "जे लोक उपाशी आहेत, त्यांचा आवाज तुम्ही ऐकू शकणार नाही, ओसाड घरांमध्ये तुम्हांला समजूतदारपणा सापडणार नाही. लोकांनी तुमचे ऐकावे अशी तुमची इच्छा असल्यास त्यांची पोटं भरलेली असणे अतिशय आवश्यक आहे, लोकांनी तुमचे ऐकावे अशी तुमची इच्छा असल्यास त्यांच्या घरात समृद्धी असणे आवश्यक आहे, त्यांनी संपूर्ण सजग राहण्यासाठी त्यांच्या घरात समृद्धी असणे आवश्यक आहे." या परिसरातील तरुणांनी सन्माननीय रीतीने उपजीविका मिळविण्यासाठी त्यांना सक्षम बनविणे अतिशय महत्वाचे आहे.
अनेक तरुण तुम्हांला इथेतिथे फिरताना, निरर्थक गोष्टींमध्ये वेळ फुकट घालविताना दिसतील. योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि अयोग्य शालेय शिक्षण, यामुळे हे तरुण राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये मानवी संसाधन म्हणून योगदान देण्याच्या प्रक्रियेतून वगळले गेले आहेत किंवा आपण असे म्हणू की बाहेर फेकले गेले आहेत.
लोक बिरादरी शिक्षा संकुल तरुण महिला व पुरुषांसाठी काही व्यावसायिक प्रशिक्षण अभ्यासक्रम आयोजित करेल; हे व्यवसाय स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक वातावरणात रुजलेले असतील, स्वदेशी उत्पादने घेणारे आणि वर्तमान काळाच्या गरजांनुसार असतील. अशा प्रकारे, पारंपरिक ज्ञान प्रणाली आणि वर्तमान काळाच्या गरजा यांच्या संगमातून हे व्यवसाय उभे राहतील. बाबा आमटे यांनी आपल्यासमोर एक ध्येय एका खबरदारीसह ठेवले आहे, "विज्ञान आणि योग्य तंत्रज्ञानाचा जोरदार प्रचार केला जात आहे, परंतु त्याच वेळी नैसर्गिक नुकसान, विशेषतः अपरिवर्तनीय नुकसान न होण्याची काळजी घेतली पाहिजे." उपलब्ध योग्य तंत्रज्ञानाच्या सुयोग्य वापराद्वारे आम्ही ते ध्येय गाठण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू.
आम्ही सादर करणाऱ्या संभाव्य व्यवसाय आणि अभ्यासक्रमांची यादी खालीलप्रमाणे,
लोक बिरादरी शिक्षा संकुल स्थानिक समुदायांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एक बहुआयामी परिसर असेल. म्हणूनच, आमचा दृष्टीकोन चैतन्यशील आणि बहुलवादी असेल. एका बाजूला, आम्ही पौष्टिकता, कला आणि हस्तकला यांचे पारंपारिक ज्ञान पुढे नेण्यासाठी आणि त्यांचे मूल्य जतन करण्यावर लक्ष केंद्रित करू. तसेच, आम्ही शैक्षणिक विषय, ज्ञान निर्मिती आणि वाचनासाठी आनंद यांसाठी उपलब्ध नवीनतम साहित्याशी त्यांचा परिचय करून देऊ. आम्ही अन्न प्रक्रिया, त्याचे जतन आणि तेल निर्मितीसाठी स्वदेशी पद्धती वापरु. स्थानिक समुदायाची उन्नती करण्यासाठी संगणक प्रशिक्षण देखील दिले जाईल.
संक्षेपाने आम्ही असे म्हणू शकतो की आजच्या पद्धती आणि तंत्रज्ञानाचा प्रामाणिकपणे वापर करून, स्वदेशी ज्ञान आणि त्याच्या मागे असलेल्या मूल्यांचे रक्षण करणे आणि प्रशंसा करणे हाच आमचा दृष्टीकोन आहे.
आमचे बोधवाक्य आहे, "दान उध्वस्त करते, काम एका व्यक्तीला उभारते." म्हणून स्थानिक स्त्रोत, योग्य तंत्रज्ञान यांचा वापर करून तरुण महिला व पुरुषांना कुशल उद्योजक होण्यासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
प्रत्येक प्रयत्न टिकवून ठेवण्यासाठी, वाढविण्यासाठी आणि आकर्षक करण्यासाठी संसाधने आवश्यक आहेत, म्हणजे ते पूर्ण जगासाठी एक प्रतीक होऊ शकेल. वरवर पाहता, या प्रतीकाची स्थिरता ते स्वतःच निर्माण करू शकणाऱ्या स्त्रोतांवर अवलंबून असते. पण आपल्याला जसे माहीतच आहे की प्रत्येक नवीन उपक्रम आणि प्रयोगास बाहेरून समर्थन आवश्यक असते, विशेषतः आर्थिक दृष्टीने. लोक बिरादरी शिक्षा संकुल एकाच वेळी सर्व पर्यायांकडे लक्ष देईल. म्हणून, आम्ही आमच्या भोवतालच्या उपलब्ध संसाधनांना ओळखून त्यांचे अन्वेषण करू, तसेच आमच्या शुभचिंतक आणि समान विचारधारा असलेल्या संस्थांकडून विविध मार्गांनी समर्थन मिळवू.
आम्हांला हव्या असलेल्या काही स्रोतांची खाली नोंद केली आहे.
चपळ आणि चैतन्यशील लोकांचा एक संघच या प्रकल्पाला पुढे नेऊ शकतो. तेव्हा संघ बांधणी हा या योजनेचा अतिशय महत्वाचा घटक आहे. आमच्या कल्पनेप्रमाणे, आम्हांला खाली दिलेल्या जवाबदाऱ्या हाताळण्यासाठी कार्यक्षम लोकांची आवश्यकता आहे.
लोक बिरादरी प्रकल्पाला सन्माननीय प्रतिष्ठा आहे आणि देशाच्या सर्वात वंचित क्षेत्रातील लोकांना सेवा देण्याचा दीर्घ इतिहास आहे. डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे प्रयत्न आणि सेवा अनेक देशाच्या सरकारांनी, नागरी समाजांद्वारे, व्यावसायिक संघटनांद्वारे, धर्मादाय संस्था आणि मिशनरींद्वारे, उद्योग आणि व्यवसाय संघटनांद्वारे आणि अनेक ख्यातनाम व सामान्य व्यक्तींनी विविध स्तरावर मान्य आणि पुरस्कृत केले आहेत.
परिणामी, आमच्याकडे सहायक संस्था आणि बहुमुखी व्यक्तींचे विस्तृत जाळे आहे. या प्रकल्पाच्या चांगल्या कार्यासाठी आम्ही शुभचिंतकांच्या या सेतूचा उपयोग करू इच्छितो. ही मूलभूत क्षेत्रे आहेत जिथे आम्ही तिच्या प्रतिबद्धतेकडे पाहतो, जे परस्परांना उपयुक्त होईल.
शिक्षणाचा प्रभाव जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रावर होतो, हे जीवनात गुणात्मक बदल आणते; त्याच वेळी, मोजमाप पद्धतीने ते मोजणे कठीण आहे. आमच्या कल्पनेप्रमाणे, या क्षेत्रातील लोकांच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून आणण्याचा आमचा मुख्य उद्देश आहे, जे आर्थिक स्थिरता, स्वयं आणि समाजाविषयी जागरूकता आणि तरुण पिढीच्या शालेय शिक्षणाबद्दल उत्सुकता या दृष्टीने प्रतिबिंबित होईल. प्रसिद्ध विद्वान अमर्त्य सेन यांनी म्हंटल्याप्रमाणे, "मानवी विकास, दृष्टीकोन म्हणून, मी मूलभूत विकास कल्पना म्हणून घेतलेल्या गोष्टीशी संबंधित आहे. मुख्यत्वे, माणसे जगतात त्या अर्थव्यवस्थेच्या समृद्धीपेक्षा (जे जीवनाचा फक्त एक भाग आहे) मानवी जीवनाची समृद्धी वाढविणे."
आम्ही स्वतःसाठी काही प्रमाणित उद्दिष्टे ठरवू इच्छितो, जी आम्हांला योग्य मार्गावर ठेवण्यास मदत करतील, आमच्या प्रवासात मार्गदर्शन करतील आणि आमच्यात यश आणि आव्हानाची भावना निर्माण करतील.
पुढील पाच वर्षांच्या पहिल्या टप्प्यासाठी आम्ही स्वतःला वचन देतो की,